संत्रा-मोसंबी-लिंबू
मृग बहर व्यवस्थापन
मृग बहरासाठी बाग ताणावर सोडली असता ताण पूर्ण होण्यापूर्वी पाऊस आल्यास, क्लोरमेक्वॉट क्लोराइड २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. दुसरी फवारणी २० दिवसांनी पुन्हा घ्यावी.
मृग बहर घेण्यासाठी, मृगाचा पाऊस वेळेवर किंवा अपुरा झाल्यास त्वरित ओलीत सुरू करावे. ठिंबक सिंचन संच असल्यास, त्याद्वारे ताणांवर असलेल्या झाडांना पाणी द्यावे. झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी आळे व दांड सपाट करून घ्यावेत.