कांदा-लसूण
कांद्याची सड आणि कोंब येणे या समस्या उद्भवू नयेत, यासाठी साठवणुकीतील कांद्यांवर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. चाळीत हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही. पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात. लसणाच्या गड्ड्या पातीसह हवेशीर चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवाव्यात.