संत्रा-मोसंबी-लिंबू
आंबिया बहरातील फळांचे व्यवस्थापन
एक आठवड्यापेक्षा जास्त काळपर्यंत पावसामध्ये खंड पडल्यास, आंबिया बहराच्या फळांची वाढ चांगली होण्यासाठी १.५ किलो पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) अधिक १.५ ग्रॅम २,४-डी प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
आंबिया बहराच्या फळांची गळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम २, ४-डी किंवा जिबरेलीक अॅसिड अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांनी घ्यावी.