खोडवा ऊस
जीवाणू संवर्धकांचा वापर
अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरीलम, अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी अर्धा किलो प्रति एकर या प्रमाणात २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून ऊसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र मिसळून वापरावीत. जीवाणू संवर्धकांचा वापर केल्यास २५ टक्के नत्र आणि स्फुरदयुक्त खतांची बचत होते. म्हणून शिफारशीत नत्र आणि स्फुरदाची खतमात्रा २५ टक्क्यांनी कमी करावी.
खोडवा ठेवताना जीवाणू खतांची मात्रा दिली नसल्यास, खोडवा ठेवल्यानंतर दोन महिन्यांनी ४०० मि.लि. द्रवरूप अॅसिटोबॅक्टर जीवाणू संवर्धक २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी आणि प्रति एकरी अर्धा किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक ४० किलो कंपोस्ट खतात मिसळून सरीमधून द्यावे.