सुरु ऊस
सिंचनाची सोय असल्यास सुरू उसाची मोठी बांधणी करून घ्यावी. सुरू उसासाठी मोठ्या बांधणीच्या वेळी नत्र ४० किलो (नीमकोटेड युरिया ८७ किलो), स्फुरद २२ किलो (सिंगल सुपर फॉस्फेट १३८ किलो) आणि पालाश २२ किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ३७ किलो) प्रतिएकरी याप्रमाणात खतमात्रा द्यावी. को-८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी रासायनिक खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी.