पूर्वहंगामी ऊस
हुमणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करावी. शेतात रॉकेलमिश्रीत पाण्याच्या टाक्या ठेऊन त्यावर बल्ब लावल्यास, हुमणीचे भुंगेरे त्याकडे आकर्षित होऊन पाण्यात पडून त्यांचे नियंत्रण होईल.
शेताजवळील कडुनिंब, बोर, आणि बाभळीच्या झाडावरील भुंगेरे नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस ४ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.