तूर लागवडीसाठी जमिनीची निवड

 तूर

मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीस योग्य असते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान सामू असावा. आधीच्या पिकांची धसकटे, काडी, कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे जमिनीची खोल नांगरट करावी. त्यानंतर जमीन चांगली तापू द्यावी. वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. वखराची शेवटची पाळी देण्याआधी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post