वेल वर्गीय पिके
उष्ण व कोरड्या वातावरणात लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. ही कीड पानांच्या मागील बाजूस राहून, पानांतील रस शोषते. परिणामी पानांवर पिवळे, तांबडे, लाल चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. कालांतराने पाने गळून पडतात.
⚔️ नियंत्रण
👉परादुर्भावाच्या प्राथमिक अवस्थेत कीडग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत.
👉परादुर्भाव वाढल्यास, अॅझाडीरेक्टीन (१०,००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा फेनपायरॉक्झीमेट (५ ईसी) १ मि.लि. किंवा फेनाझाक्वीन (१० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.