संत्रा-मोसंबी-लिंबू पाणी व्यवस्थापण

 संत्रा-मोसंबी-लिंबू


संत्रा व मोसंबी बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला १७ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. दोन वर्षे वयाच्या झाडाला ३४ लिटर पाणी/ दिवस/ झाड, तीन वर्षे वयाच्या झाडाला ५१ लिटर पाणी/ दिवस/ झाड द्यावे. चार वर्षे वयाच्या झाडाला ७४ लिटर पाणी, तर ८ वर्षे वयाच्या झाडाला १८८ लिटर/ दिवस/ झाड व १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना २३५ लिटर/ दिवस/ झाड पाणी द्यावे. 

लिंबू बागेस एक वर्ष वयाच्या झाडाला ११ लिटर पाणी/ दिवस/ झाड, दोन वर्षे वयाच्या झाडाला १७ लिटर, ३ वर्षे वयाच्या झाडाला २५ लिटर, ४ वर्षे वयाच्या झाडाला ३६ लिटर पाणी प्रति दिन प्रति झाड द्यावे. पाच वर्षांच्या झाडाला ४२ लिटर/ दिवस/ झाड, ८ वर्षांच्या झाडाला ७३ लिटर/ दिवस/ झाड आणि १० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडांना १०८ लिटर/ दिवस/ झाड द्यावे. 

पाणीटंचाईच्या काळात झाडाभोवती काळी पॉलीथीन (१०० मायक्रॉन जाडी) पसरून घ्यावी. आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावतो. आच्छादनासाठी शेतीतील निरूपयोगी सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थ वापरता येतात. यामध्ये प्रामुख्याने डवरीचे सड, तुराट्या, वाळलेले गवत, गव्हाचे काड, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा थर झाडाच्या सभोवती पसरावा.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post