केळी
बाग तणमुक्त ठेवावी. मुख्य खोडालगत आलेली पिले धारदार विळ्याने जमिनीलगत कापावीत. तण व कापलेली पिले यांचा खोडाजवळ आच्छादन म्हणून वापर करावा. खोडाभोवती लोंबकळणारी, रोगविरहीत वाळलेली किंवा पिवळी पाने कापू नयेत. खोडाचे उष्ण हवेपासून संरक्षण होण्यास त्याची मदत होते.