आले
तण नियंत्रण
आल्यामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे जमिनीवर फवारणी करावी. लव्हाळा किंवा हराळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९-१० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ एसएल) हे तणनाशक ४ ते ५ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सजीव आच्छादन (मेथी, कोथिंबीर) करावयाचे असल्यास तणनाशकांचा वापर टाळावा. साधारण पंधरा दिवसांपासून आल्याची उगवण व्हायला सुरवात होते, त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये.