पशु संवर्धन :-
उपलब्ध असलेल्या चारा, खाद्य घटकांचे पचन अधिक वाढविण्यासाठी सूक्ष्म पोषक तत्त्वांचा वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने ऊर्जेसाठी बायपास फॅट तसेच प्रजननासाठी कॅल्शियम व इतर नैसर्गिक खनिजे, योग्य पचनासाठी रुमेन बफर व यीस्ट कल्चर, ॲसिडीटी रेग्यूलेटर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन तसेच दूध वाढीसाठी व पान्हा सुटण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचे अर्क यांचा समावेश होतो. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार वरील पूरकांचे मिश्रण पशू आहारात दिल्यास दुभत्या गाई, म्हशी वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास, बॉडी स्कोअर (प्रकृती अंक) उत्तम राहण्यास, दिलेल्या चारा व खाद्याचे योग्य पचन होण्यास तसेच दूध व फॅट वाढण्यास मदत होते.