हळद
हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे एक फूट खोलीवरील माती परीक्षण केल्यास फायदेशीर ठरते. जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने हळद लागवडीपूर्वी द्विदल किंवा हिरवळीचे पीक (ताग किंवा धैंचा) घेऊन ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे.