बाजरी पिक आठवडी सल्ला

 बाजरी

पीक फुलोऱ्यावर असताना हिरवट सोनेरी रंगाचा सोंड असलेला किडा (सोसे/ हिंगे) फुलोऱ्यात आलेल्या कणसावर हमखास दिसून येतो. तो कणसावरील फुलोरा पूर्णपणे खाऊन टाकतो. त्यामुळे कणसात दाणे भरण्याची क्रिया थांबते व कणसात अजिबात दाणे भरत नाहीत. याची वाढ फार झपाट्याने होऊन २ ते ३ दिवसात सर्व कणसावर पसरते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते. 

पीक फुलोऱ्यात असताना कणसावर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच, क्लोरपायरीफॉस (१.५ डीपी) एकरी ८ किलो या प्रमाणात सकाळच्या वेळेस वारा शांत असताना धुरळणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post