कांदा-लसूण | कांदा बियाण्याची साठवण |

 कांदा-लसूण
कांदा बियाण्याची साठवण 

👉मळणी केलेल्या बियांमध्ये १०-१२ टक्के आर्द्रता असते. त्यामुळे स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी.  

अशा बियांचे आयुष्य एक-दीड वर्ष असते. बियांत पाण्याचा अंश ६ टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास त्यांची उगवणक्षमता कमी होते. 

👉आपल्याकडे कांदा बी काढणी उन्हाळ्यात होत असल्याने वातावरण कोरडे व उष्ण असते. त्यामुळे सुकवण चांग���ी होऊन बियांमध्ये ६ टक्के आर्द्रता राखणे सोपे जाते. 

👉कांदा बी जास्त दिवस साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंग साहित्याचा वापर केला जातो. उदा. कापडी पिशवी, प्लॅस्टिक पिशवी, कागदी पाकीट, ॲल्युमिनियम पाकीट किंवा ॲल्युमिनियम पॉलिथिन पाकीट इत्यादी 

👉जास्त दिवस बी चांगले ठेवण्यासाठी आर्द्रतारोधक पिशव्यांचा वापर करावा. परंतु, या पिशव्यांमध्ये बी ठेवण्याआधी बियांमध्ये ६ टक्केपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियांच्या पॅकिंगसाठी हवाबंद टीनच्या डब्यांचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी वाळवून भरले तर दोन वर्ष चांगले राहू शकते. कांदा बियाणे योग्यप्रकारे पॅकिंग करून न साठवल्यास १२ महिन्यांच्या आत त्याची उगवणक्षमता नष्ट होते. 

👉शीतगृहामध्ये १२-१५ अंश सेल्सिअस तापमान व ३५-४५ टक्के आर्द्रता असणार्‍या वातावरणात बियाणे दोन-तीन वर्षांसाठी ठेवता येते. मात्र साठवणुकीआधी बियाण्याची आर्द्रता ६ टक्के पातळीवर राखलेली असावी. 

👉पकिंग केलेल्या बियांच्या पाकिटावर किंवा पिशवीवर जातीचे नाव, बियांचा प्रकार, पॅकिंगची तारीख, उगवणक्षमता इत्यादी सर्व बाबींची नोंद करणे आवश्‍यक आहे.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post