कोबी वर्गीय पिके
लागवडीनंतर वेळोवेळी तण काढून व खुरपून जमीन भुसभुशीत राखावी. या पिकांची मुळे उथळ असल्यामुळे खोलवर खुरपणी किंवा खांदणी करू नये. गड्डा धरू लागल्यानंतर रोपांना भर द्यावी. त्यामुळे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने व गरजेनुसार पिकाला पाणी द्यावे. गड्डे तयार झाल्यावर पाणी बेताचे द्यावे; अन्यथा गड्डे फुटण्याची शक्यता असते.