हळद पिक सल्ला| कंदांची विभागणी |

 हळद     

कंदांची विभागणी 


👉जठे गड्डे - मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. सदरचे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत. 

👉सोरा गड्डा - लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्याविरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो. 

👉बगल गड्डे - जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, त्यास अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात. 

👉हळकुंडे - बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात करतात.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post