भुईमुग
भुईमूग हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. पेरणीच्या वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असावे. भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमिनीची निवड करावी. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने, जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन, आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास, तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.