भुईमुग बियाणे पेरणीसाठी बीज प्रक्रिया

भुईमुग 


उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. पेरणीच्या वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक असावे. रोपावस्थेत उद्‌भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, बियाण्याला ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्याला प्रत्येकी २५ ग्रॅम रायझोबिअम व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post