कापूस फरदड सल्ला

 कापूस

कापसाचा हंगाम वेळेत (डिसेंबरअखेर किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत) संपवणे, फरदड न घेणे आणि एप्रिल-मे महिन्यातील पूर्वहंगामी कपाशीची लागवड न करणे या बरोबरच शिफारशीत कलावधीत म्हणजेच जून महिन्यात लागवड या बाबी गुलाबी बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या आहेत. कमी कालावधीत व एकाच वेळेत परिपक्व होणाऱ्या (१५० ते १६० दिवस) वाणांची निवड करावी. सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास पूर्वहंगामी कपाशीऐवजी उन्हाळी हंगामातील पर्यायी पिके घ्यावीत. पिकांतील फेरबदलामुळे किडीचा जीवनक्रम खंडित होण्यास मदत होईल. बेवड मिळेल अशा पिकांमुळे जमिनीची सुपीकताही टिकून राहील.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post