सुर्यफुल जमिनीची निवड व पूर्वमशागत

 सुर्यफुल

जमिनीची निवड व पूर्वमशागत 

पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी. सर्वसाधारणपणे ३० सें.मी.पेक्षा जास्त खोल कसदार जमीन लागवडीस निवडावी. जमीन आम्लधर्मीय, क्षारयुक्त असली तरी तिचा सामू ६.५ ते ८.५ या दरम्यान असावा. कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या किंवा पाणथळ जमिनीत पीक चांगले येत  नाही. फार भारी जमिनीत उंच वाढून लोळण्याची शक्‍यता असते. चोपण जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची योग्य वाढ होत नाही. पिकावर केवडा रोग येण्याची शक्‍यता असते. 

पिकाचे मूळ ६० सें.मी.पर्यंत खोलवर जात असल्यामुळे, २० ते ३० सें.मी. खोलवर पहिली नांगरट करावी. दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर कुळवाच्या उभ्या-आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी एकरी १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post