हरभरा
किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेल्यास झाडाची वाढ खुंटते. फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकामध्ये फुलगळ होऊ शकते. परागीभवनास अडथळा निर्माण होऊन बीजधारणा होत नाही. त्यामुळे घाट्यामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. तसेच ढगाळ वातावरण राहिल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी फुलोरा अवस्थेतील हरभरा पिकास, युरिया २ टक्के (२ किलो प्रति १०० लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.![]()