गहू
सध्या असलेली शीतलहर गहू पिकासाठी पोषक आहे. खत आणि पाण्याच्या पाळ्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढवण्यात यश येईल. पेरणीनंतर ५० ते ५५ आणि ७० ते ७५ दिवसांच्या अवस्थेतील पिकाला १९-१९-१९ या विद्राव्य खताच्या २ टक्के (२ किलो प्रति १०० लिटर पाणी) या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात. यामुळे गहू उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.![]()