विजयसिंह काकडे, डॉ. डी. डी. नागरे
राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था,
बारामती, जि. पुणे
ड्रॅगन फ्रूटची रोपे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार होतात. योग्य लांबीच्या फांद्या वापरल्याने अधिक फुटवा व मुळांची वाढ चांगली होऊन उत्तम गुणवत्तेची रोपे मिळतात. सद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध प्रकार हे सर्व बाहेरील देशांमधून आलेले आहेत. भारतामध्ये, पांढरा गर व लाल साल, लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल इत्यादी प्रकार लागवडीस उपयुक्त आहेत. विविध कृषी संशोधन संस्थांमार्फत फळांच्या जातींबाबत संशोधन चालू आहे. सध्यातरी, या फळपिकाच्या नोंदणीकृत तसेच स्थानिक जाती उपलब्ध नाहीत. रोपनिर्मिती
• ड्रॅगन फ्रूटची झाडे बियांद्वारे किंवा कटींगद्वारे तयार केली जातात. कटींगद्वारे अतिशय जलद गतीने व सोप्या पद्धतीने रोपे तयार केली जातात.
संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा..
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.