कापूस पिक सल्ला |फरदड घेणे टाळा|

 कापूस

फरदड घेणे टाळा 


साधारणतः कापूस हंगामाच्या मध्यापासून (साधारणतः लागवडीच्या ९० दिवसांपासून पुढे) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरू होतो व शेवटपर्यंत हळूहळू वाढत जातो. ही कीड बोंडामध्ये लपून राहत असल्यामुळे वरून सहजासहजी प्रादुर्भाव दिसून येत नाही. परिणामी लांबलेल्या हंगामानुसार बोंडांवरील प्रादुर्भावआणि त्यामुळे होणारे कपाशी व बियांचे नुकसानही वाढत जाते. आदर्श पीक पद्धतीमध्ये कपाशीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटी किंवा जास्तीत जास्त जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत संपवला पाहिजे. त्यानंतर शेतातील पिकाचे अवशेष काढून नष्ट करावे. अळीला खाण्यासाठी पिकाचा अभाव व हिवाळ्यातील थंड तापमान यामुळे अळ्या निसर्गतः सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेतील अळ्या प्रादुर्भावग्रत बोंडे व पिकाचे अवशेष यामध्येच लपून राहतात. पीक काढणीनंतर शेतात गुरे, शेळ्या-मेंढ्या चरावयास सोडाव्यात. पऱ्हाटीचे अवशेष जाळून टाकावेत. कोणत्याही कारणास्तव वेचणीनंतर शेतात कपाशीचे पीक तसेच ठेवणे किंवा कपाशी पिकांचे अवशेष साठवणे टाळावे. अशी तजवीज केल्यामुळे खाद्य पुरवठ्याअभावी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होतो. पुढील हंगामातील प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post