डाळिंब आंबीया बहार अन्नद्रव्य व्यवस्थापन (जाने-फेब्रुवारी पीक नियमन)

 डाळिंब

आंबीया बहार (जाने-फेब्रुवारी पीक नियमन) 


बागेची अवस्था - ताणावर असलेली बाग आणि १५ जानेवारीनंतरचे पीक नियमन 

अन्नद्रव्य व्यवस्थापन 

👉बहार धरतेवेळी पहिले पाणी देताना २५-३० किलो शेणखत प्रतिझाड किंवा १५-२० किलो शेणखत + २ किलो गांडूळखत + २ किलो निंबोळी पेंड प्रतिझाड किंवा ७.५ किलो पूर्ण कुजलेले कोंबडी खत + २ किलो निंबोळी पेंड प्रतिझाड याप्रमाणे द्यावे. 

👉२.५-२.८ किलो जिप्सम आणि ८०० ग्रॅम मग्नेशियम सल्फेट प्रतिझाड मातीत मिसळून द्यावे. 

👉जैविक फॉर्म्युलेशन जसे की अझोस्पिरिलम sp., एस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि पेनिसिलियम पिनोफिलम वेगवेगळे गुणन करा. जैविक फोर्मूलेशन आपल्या शेतात वाढविण्यासाठी १ किलो जैविक फॉर्म्युलेशन १ टन चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. या मिश्रणाचे सावलीच्या ठिकाणी बेड तयार करा. त्यामध्ये ६०-७० टक्के ओलावा ठेऊन दिवसा आड त्याची उलथापालथ करत राहावे. साधारणपणे १५ दिवसांत जीवाणूंची चांगली वाढ होते. हे मिश्रण प्रतिझाड १०-२० ग्रॅम वापरा. 

👉आर्बस्क्युलर मायकोरायझा बुरशी (एएमएफ) (राईझोफॅगस इरेगुल्यारीस, ग्लोमस इंट्राडेलिसिस) हे १०-१५ ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे दयावे. 

👉खते दिल्यानंतर लगेचच हलके पाणी दयावे.



Post a Comment (0)
Previous Post Next Post