केळी
घडाची योग्य वाढ व पक्वता होण्याकरिता शेवटची फणी उमलल्यानंतर त्वरित केळफूल कापून बागेबाहेर नष्ट करावे. घडावर अतिरिक्त फण्या ठेवू नयेत. अपूर्ण व अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. तसेच केळफूल कापणीनंतर घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम व युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी. यामुळे घडांचे वजन वाढते व घड लवकर काढणीस येतात. फळांच्या योग्य वाढीसाठी केळफूल कापणी, फण्यांची विरळणी आणि रसायनांची फवारणी झाल्यानंतर घड ७५ x १०० सें.मी. आकारमानाच्या २-६ टक्के सच्छिद्र पॉलिप्रॉपीलीन (१०० गेज) पिशव्यांनी झाकावा. यामुळे घडाचे थंड हवा, धूळ, पाणी, दव, फुलकिडी यांपासून संरक्षण होते. त्याचबरोबर घडाभोवती सूक्ष्म वातावरण तयार होऊन घड लवकर पक्व होतो.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.