पशु संवर्धन :-
थंड वातावरणामुळे जनावरांच्या नाक व डोळ्यांतून पाणी येणे, भूक कमी होणे, थरथर कापणे इ. लक्षणे दिसतात. संध्याकाळ होताच जनावरांना गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यामध्येही थंड वारे लागणार नाही, याची काळजी घ्यावी. जनावरांना गोठ्यातच कोरडा चारा उपलब्ध करून द्यावा. जास्त थंडी असल्यास, गोठ्यामध्येच शेकोटी पेटवून गोठा उबदार करावा, मात्र धूर व्यवस्थित बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी. योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा, तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे. वासरांची विशेष काळजी घ्यावी, गोठयामध्ये स्वच्छता करावी. जंतुनाशकाने गोठयाची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. जनावरांचे वेळेवर जंत निर्मूलन करावे. त्यांना ताजे व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पाणी जास्त थंड असल्यासही गाई-म्हशी पाणी कमी पितात, पोटातील आम्लता (ॲसिडीटी) वाढते. त्यामुळे उत्पादन व शरीर स्वास्थ्य इत्यादीवर विपरीत परिणाम होतो. शक्य झाल्यास गाई-म्हशींना कोमट पाणी पिण्यास द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.