कांदा
🧅 हंगामानुसार कांदा जातींचे बीजोत्पादन
✨खरिपातील जातींचे बीजोत्पादन :
खरिपातील जातींचे कांदे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या कांद्यांना महिनाभर विश्रांती देऊन डिसेंबर महिन्यात कांदे बीजोत्पादनासाठी लावले जातात. त्यापासून एप्रिल-मे महिन्यात बी तयार होते. खरीप कांद्याचे उत्पादन व बीजोत्पादन एकाच वर्षात पूर्ण करावे लागते. लागवडीचे वेळापत्रक योग्यरीतीने पाळले, तरच खरीप कांद्याचे बीजोत्पादन चांगले आणि वेळेवर करता येते. खरीप कांद्याचे बी मे महिन्यात तयार होऊन पॅकिंग करून त्याच महिन्यात विकले जाणे आवश्यक असते. अन्यथा बी पुढच्या खरीप हंगामात विकावे लागते. साठवणीत बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. शिवाय वर्षभर भांडवलदेखील गुंतून राहते, हे लक्षात घ्यावे.
✨रब्बी हंगामातील जातींचे बीजोत्पादन :
रब्बी हंगामातील जातींची रोपे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लावली जातात. एप्रिल-मे महिन्यात कांदे काढून, वाळवून ते चाळीत साठवले जातात. ऑक्टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांद्याची साठवण हा गुणधर्म आपोआप प्रत्येक पिढीत जोपासला जातो. कांदे रंगाने व आकारानुसार निवडले जात असल्याने पुढील पिढी अधिक चांगली निवडली जाते. कांद्यांना जवळपास पाच ते सहा महिने विश्रांती मिळत असल्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात. बियाण्याचे उत्पादन खरिपाच्या जातींपेक्षा जास्त मिळते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.