गहू
💧 पाणी व्यवस्थापन
पेरणी शेत ओलावून वाफसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाचवेळा पाणी द्यावे लागते.
👉पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन
मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी
फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी
दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी
👉अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन
पाण्याचा तुटवडा असल्यास शेततळ्याच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास संरक्षित पाणी द्यावे. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले, तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले, तर उत्पादनात २० टक्के घट येते. तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.