तूर
थंडीमुळे जेथे पीक फुलोरा, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे, तेथे पिकाची शारीरिक क्रिया मंदावून फुलगळ होण्याची शक्यता आहे. तसेच पेशीतील पाणी थंडीमुळे आकसून पेशींना हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दाणे आकसणे तसेच तडकण्याची शक्यता आहे. यासाठी शेताच्या सभोवती ओला काडीकचरा व गवत जाळून धूर करावा. उपलब्धतेनुसार संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. पिकावर पोटॅशियम नायट्रेट (१३-०-४५) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.