हळद
करपा व पानावरील ठिपके (रोगकारक बुरशी: कोलेटोट्रिकम कॅपसिसी अथवा टॅफ्रिना मॅक्युलन्स)
सकाळी पडणारे धुके व दव हे वातावरण रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल असते. ‘कॉलेटोट्रिकम कॅपसिसी’ बुरशीमुळे पानावर अंडाकृती ठिपके पडतात. तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. ‘टॅफ्रिना मॅक्युलन्स’ या बुरशीमुळे पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके आढळतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. लागवडीपासून सात महिन्यांपूर्वी पाने करपल्यास उत्पादनामध्ये मोठी घट येते.
नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तीव्रता वाढल्यास, बोर्डो मिश्रण १ टक्का किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १ मि.लि. किंवा क्लोरथॅलोनील (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.