गहू
गहू पिकात चांदवेल, हरळी, जंगली ओट, चिमनचारा, घोडा घास, चिलू आणि गाजर गवत यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. यासाठी पीक १८ ते २१ दिवसांचे झाल्यावर लहान कोळप्याने पिकाच्या दोन ओळींत एक पाळी देऊन तण काढावे. कोळपणीमुळे दोन ओळींतील तण निघते आणि जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. त्यामुळे जमीन मोकळी होऊन हवा खेळती राहते. पिकाच्या मुळांची वाढ भरपूर होते.
गव्हामधील तणांच्या रासायनिक नियंत्रणासाठी, तणे दोन ते सहा पानांवर असताना क्लोडीनोफॉप प्रोपार्जील (१५%) + मेटसल्फ्युरॉन मिथाईल (१% डब्ल्यूपी) १६० ग्रॅम प्रति एकर प्रमाणे २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.