रब्बी ज्वारी
ज्वारी पिकावर येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण
⭕️काणी - काणी या रोगाचे दाणे काणी, मोकळी काणी आणि झिपरी काणी असे प्रकार आहेत. काणी बुरशीजन्य रोग असून रंगाने काळी असते. या रोगाचे बिजाणू बियांना चिकटून राहतात आणि बियाबरोबर रुजतात.
हे टाळण्यासाठी मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे निवडून नष्ट करावीत. त्याच प्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. (प्रमाण : ३०० मेश गंधक ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे)
⭕️तांबेरा - पानांच्या खालच्या बाजूस गोल लांबट तांबूस जांभळट ठिपके दिसतात. त्यातून लाल किंवा तपकिरी भुकटी बाहेर पडते, त्यामुळे पाने वाळतात.
नियंत्रणाकरीता, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
⭕️करपा - बुरशीजन्य रोग असून पानावर पिवळे, राखी रंगाचे ठिपके दिसतात. पाने करपून जातात.
नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.
⭕️खडखड्या - पीक पक्व होण्याच्या अवस्थेत असताना या रोगामुळे ताटाच्या खोडातील गाभा सुकतो. ताटातील भेंडाचे धागेदोरे होतात आणि ते काळे पडतात. ताटे मोडून पडतात. कडकड आवाज येतो.
हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी झाल्यास संरक्षित पाणी द्यावे. पिकामध्ये जमिनीवर पालापाचोळा पसरावा.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.