कापूस
कापसाची प्रत ठरविण्यासाठी आवश्यक बाबी
⭐️रंग- प्रत्येक वाणाच्या कपाशीला विशिष्ट रंग असतो. उत्तम प्रतीच्या कपाशीला त्या वाणाचा मूळ रंग दिसून येतो. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने भिजला गेल्यास त्याचा परिणाम रंगावर होतो. त्यामुळे लाल किंवा पिवळसर रंगाची रुई आढळल्यास अशा रुईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो.
⭐️कापसाची स्वच्छता- कपाशीची वेचणी करताना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काहीवेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशाप्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालापाचोळा, नख्या, माती इत्यादी अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतीवर परिणाम होतो.
कापूस आठवडी सल्ला | कापूस प्रतवारी |
⭐️तंतूंची लांबी- साधारणतः कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रुईतील थोडा भाग घेऊन हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ट उपकरणांद्वारे धाग्याची लांबी ठरवता येते. परिणामी अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो.
⭐️तंतूची ताकद- विक्रीस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेऊन दुसऱ्या हाताने कापसातील तंतू वेगळे करून व तंतूंना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूंची ताकद ठरविली जाते. चांगले, मध्यम आणि कमी अशाप्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कपाशीत परिपक्व व अपरिपक्व कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतूंच्या लांबीप्रमाणे ताकदीवर भर देण्यात येतो.
⭐️तंतूची परिपक्वता- विक्रीस आणलेला कापूस पूर्णतः परिपक्व, अर्धपरिपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते व रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रुईचे प्रमाण अधिक असते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.