तूर
कीड नियंत्रण
✨शेगा पोखरणारी अळी - सुरवातीच्या काळात अळ्या कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे
✨पिसारी पतंग - कळी, फुलोरा अवस्थेपासून ते काढणीपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या कळी, फुले व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या शेंगा किंवा शेंगांवरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात.
🛡️ उपाययोजना
1️⃣ पहिली फवारणी - पिकास फुलकळी येताना, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
2️⃣ दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
3️⃣ तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.७ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.