भात पिक आठवडी सल्ला

 भात

भात पूर्णपणे वाळल्यावर म्हणजेच दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १४ ते १६ टक्के खाली आल्यावर मळणी करावी. मळणी नेहमीच्या अगर बैलांच्या सहाय्याने अगर मळणी यंत्राने करावी. भात मळणी यंत्राला एक गोल ड्रम आडव्या आसावर बसविलेला असतो. ड्रमवर पट्ट्या बसविलेल्या असून, त्यावर तारांचे लुप्स विशिष्ट कोनात बसविलेले असतात. या ड्रमची लांबी साधारणपणे ६० सें.मी. ते १ मीटरपर्यंत असते. कमी लांबीचे भात झोडणी यंत्र पायडल मारून किंवा इलेक्‍ट्रिक मोटारीवर चालविता येते. जास्त लांबीचे यंत्र इलेक्‍ट्रिक मोटार किंवा पॉवर टिलरद्वारे चालविता येते. यावर साधारणतः २ ते ४ मजूर एकाच वेळी काम करू शकतात. एका तासामध्ये साधारणपणे १३५ ते १५० किलो भाताची झोडणी करता येते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post