आडसाली ऊस
पक्की बांधणी करताना खताची शेवटची मात्रा देऊन संपूर्ण वरंबा पहारीच्या औजाराने किंवा लोखंडी नांगराने फोडून सायन कुळवाने कुळवावे. यामुळे ढेकळे बारीक होऊन तणांचाही बंदोबस्त होतो. दोन ओळींतील कुळविलेल्या क्षेत्रात रिजर चालवून पिकास भर द्यावी. त्यामुळे वरंब्याच्या ठिकाणी सऱ्या निर्माण होतात. या बांधणीच्या वेळी ६४ किलो नत्र (१३९ किलो युरिया), ३४ किलो स्फुरद (२१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. म्हणून नत्र, स्फुरद व पालाश या खतांची एकरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.