क्षारपड जमीन सुधारण्यासाठी ‘शारदा कार्बन प्लस’ ठरतेय फायदेशीर

डॉ. विवेक भोईटे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

शारदा कार्बन प्लस

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने ‘शारदा ऑरगॅनिक कार्बन प्लस’ हे विद्राव्य स्वरूपातील जिवाणू खत विकसित केले आहे. हे क्षारपड जमीन सुधारणा तसेच जमीन सुपीकता, पीक उत्पादन वाढीसाठी फायदेशीर दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत नदी काठ तसेच कालव्याच्या परिसरातील जमिनी अति पाणी आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे खराब झाल्या आहेत. त्याचा पीक उत्पादन आणि सुपीकतेवर परिणाम झालेला दिसतो. या जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण जास्त असल्याने भौतिक संरचना तयार होताना कणांची घनता जास्त असते. अति पाणी आणि अनियंत्रित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक होतात. जमिनीतून पाण्याचा निचरा कमी झाल्याने सोडीयम, मॅग्नेशिअम, कार्बेनेट, बाय कार्बोनेट क्षारांचा संचय वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवर क्षारांचा पांढरा थर दिसतो. या जमिनीत ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त प्रमाणात क्षारता पाहायला मिळते. जमिनीची सामू आठच्या वर गेला आहे. अशा जमिनीत उसाची मुळे वाढत नाहीत, फूट कमी मिळते. कांडी वाढत नाही. पानाचे शेंडे करपलेले दिसतात. काही जमिनीत एकरी १० ते २० टनांपर्यंत ऊस उत्पादन खाली आहे. शेतकरी जमीन आहे म्हणून नांगरट करून पीक लागवड करतात, परंतु उत्पादन आणि आर्थिकदृष्ट्या हे परवडत नाही. तसेच जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुधारणेकडे दुर्लक्ष झालेले दिसते.
                                                                               अधिक माहितीसाठी संपर्क:- ८४८५०५४५२७

संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा..

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post