खोडवा ऊस |पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते देण्याचे फायदे|

 खोडवा ऊस

खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यात (प्रत्येकी ६०:२८:२८ किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति एकर) द्यावी. पहिली खतमात्रा खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी. यासाठी पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सें.मी. अंतरावर वरंब्याच्या बगलेत, १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.
🎋पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते देण्याचे फायदे



✔️खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.
✔️दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे खतांचा ऱ्हास फारच कमी प्रमाणात होतो.
✔️खत मातीने झाकल्यामुळे वाहून जात नाही.
✔️खत तणास न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. त्यामुळे खुरपणी खर्चात बचत होते. जास्तीत जास्त खत मुख्य पिकास उपयोगी पडते.
✔️रासायनिक खतांची उपलब्धता पिकांच्या गरजेनुसार हळूहळू होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची वाढ जोमदार होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते.
✔️सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्‍य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारखे पीक येते. उत्पादनात १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post