पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

✍️ डॉ. पी. एस. देशमुख, जे. पी. खराडे

🏛 मृदा शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे

पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते. ऊस शेतीसाठी खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 

सेंद्रिय खत व्यवस्थापन 

• पूर्वहंगामी उसामध्ये पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. 

• ऊस लागणी अगोदर राहिलेले एकरी २ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. 

• शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. 

• हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडणे हा सेंद्रिय खतांचा पुरवठा करणारा परिणामकारक पर्याय आहे. यामध्ये ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.

संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा..

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post