कापूस पिक सल्ला |कापूस वेचणी कोट|

 कापूस

कापूस वेचणी कोट 

व.ना.म.कृ.वि. परभणीच्या गृह विज्ञान महाविद्यालयाच्या कौटुंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन विभागातील तज्ञांनी शेत��री महिलांना कापूस वेचताना कोणताही त्रास होऊ नये आणि कापूसदेखील जास्त वेचता यावा या उद्देशाने कापूस वेचणी कोट तयार केला आहे. हा कोट जाड कॉटनच्या कपड्याचा असल्यामुळे ऊन लागत नाही. घाम आला तर शोषला जातो. लांब बाह्यांमुळे कापसाच्या बोंडाचे ओरखडे त्वचेवर पडत नाहीत. पूर्ण शरीर झाकले जाते. कापूस जमा करण्यासाठी झोळी मोठी असल्यामुळे त्यात ५ ते ६ किलोपर्यंत कापूस मावतो. कापसाने भरलेल्या झोळीचे ओझे पोट, कमरेवर न पडता खांद्यावर पडते. यामुळे महिलांना त्रास कमी जाणवतो. झोळीतून कापूस सहज बाहेर काढण्यासाठी झोळीच्या दोन्ही बाजूस बंद दिले आहेत. ते बंद सोडले की, कापूस लवकर बाहेर काढून टाकता येतो. हा कोट भाजीपाला, फळे तोडतानादेखील वापरता येतो.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post