खोडवा ऊस आठवडी सल्ला

 खोडवा ऊस

लागवडीचा ऊस तुटून गेल्यावर खोडवा पिकामध्ये बुडखे मोकळे करून सरीमध्ये पाचट दाबून टाकावे. त्यानंतर बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. त्यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून नवीन कोंब जोमदार येतील. त्यावर लगेच १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची बुडख्यावर फवारणी करावी. यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति १० गुंठे क्षेत्रावर १ टन पाचटासाठी ८ किलो युरिया १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणार्‍या जिवाणू संवर्धनाचे शेणामध्ये द्रावण करून तो शेणकाला पाचटावर समप्रमाणात शिंपडावा. खोडव्याला पहिले पाणी द्यावे. ही क्रिया ऊस तुटून गेल्यावर पहिल्या १५ दिवसांत करावी. खोडव्यामध्ये पाचटाचे नियोजन केल्यास सुरवातीच्या काळात सरीमध्ये आच्छादन म्हणून उपयोग होतो. त्यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन सिंचनाच्या पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. साडेचार ते पाच महिन्यानंतर सर्व पाचट कुजून खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत तयार होते. पाचट ठेवण्यासाठी ४.५ ते ५ फुटाची सरी ठेवावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post