पशु संवर्धन सल्ला | किरळ लागणे |

किरळ लागणे 

जनावरांनी ज्वारीची कोवळी धाटे खाल्ल्यास होणाऱ्या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असे म्हणतात. ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते. जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले, तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट दुखते, जनावर अस्वस्थ होते. श्वासोश्वास व हृदयाचे ठोके वाढतात. श्वसनाला त्रास होतो, जनावरे थरथर कापते. बेशुद्ध पडते. 

🛡️ प्रतिबंधात्मक उपाय  

👉जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. 

👉जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळल्यानंतरच जनावरांना खाण्यास द्यावेत. कारण वाळल्यानंतर त्यामधील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते. 

👉जवारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेतात पाणी सोडतात, त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे तयार होतात. अशा शेतामध्ये आपली जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत. 

⚔️ उपचार 

👉जनावराचे पोट फुगलेले दिसते. पशुवैद्यकाच्या सल्याने तातडीने उपचार करावेत. 

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post