रब्बी ज्वारी पिकातील कीड नियंत्रण

 रब्बी ज्वारी

कीड नियंत्रण 

👉 खोडमाशी 

प्रादुर्भाव पिकाच्या बाल्यावस्थेत दिसून येतो. पोंगेमर होऊन झाडाला जमिनीलगत फुटवे फुटतात. 

नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 


१०% अंडी असलेली झाडे/ १०% पोंगेमर झालेली झाडे आढळल्यास, सायपरमेथ्रीन (१० ईसी) २ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) १.२५ मि.लि. किंवा क्विनॉलफॉल (२५ ईसी) २ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस (२० ईसी) २.५ मि.लि. 

👉 खोडकिडा 

प्रादुर्भाव पिकाची बाल्यावस्था ते पक्व अवस्थेत दिसून येतो. पानांवर एका सरळ रेषेत छिद्रे, पोंगेमर दिसून येते. कणीस मधून फाटते. 

नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

१०% झाडांच्या पानावर छिद्रे/ ५% पोंगेमर झालेली झाडे आढळल्यास, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. किंवा क्‍लोरपायरीफॉस (२० ईसी) २.५ मि.लि. 

👉 पोंग्यातील ढेकूण 

प्रादुर्भाव पोंगा अवस्थेत दिसून येतो. झाड पिवळे पडून वाळते किंवा बरोबर निसवत नाही. 

नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

प्रादुर्भाव आढळल्यास, डायमेथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा थायमेथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. 

👉 मावा 

प्रादुर्भाव कांडे तयार होणे ते फुलोरा अवस्थेत दिसून येतो. पाने आकसतात. झाडाची वाढ खुंटते व दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो. 

नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

प्रादुर्भाव आढळल्यास, डायमेथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा थायमेथोक्‍झाम (२५ डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. 

👉 कणसातील अळ्या 

प्रादुर्भाव फुलोरा ते दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड वाळते. अळ्या दुधाळ अवस्थेतील दाणे खातात. विष्ठेमुळे दाण्याची प्रत खराब होते. 

नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

२० अळ्या/कणीस आढळल्यास, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. 

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post