आंबा आठवडी नियोजन | मोहोर नियोजन |

 आंबा

आंब्यामध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया ही तशी गुंतागुंतीचीच असते; परंतु फांदीची परिपक्वता आणि विशिष्ट हवामान हे मोहोर येण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. सर्वसाधारणपणे आंबा मोहोर येण्यासाठी कमीत कमी १५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. फांदीची पक्वता, त्यातील कर्बोदक : नत्र गुणोत्तर, प्रत्येक फांदीतील संजीवकाचे प्रमाण हे प्रत्येक झाडागणिक वेगवेगळे असते. यामुळे पूर्ण झाड किंवा पूर्ण बाग एकाचवेळी पालवी किंवा मोहोर सोडत नाहीत. त्यामुळे फळे काढणीच्या वेळा बदलतात किंवा काढणी टप्प्याटप्प्याने करावी लागते. जी झाडे लवकर येतात, त्यांच्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. परंतु बऱ्याचवेळा फळे टप्प्याटप्प्याने येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत नाही. मात्र जर आंबा बाग एकाचवेळी मोहोरास आली, तर त्याची काढणी एकाचवेळी होऊन मजुरीचा खर्चही कमी होऊ शकतो. आंब्याची बाग एकाच वेळेस पालवी येऊन ती पालवी पक्व करणे आणि त्यातून एकाच वेळी मोहोर बाहेर काढणे ही प्रक्रिया काही रसायने (बड ब्रेकर) वापरून होऊ शकते. साधारणपणे १० अंश सेल्सिअस तापमान दहा-पंधरा दिवस राहिले असता किं��ा १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान दोन-तीन आठवडे राहिल्यानंतर आंब्यामध्ये बड ब्रेकरची (०-५२-३४ किंवा १३-०-४५ किंवा १२-६१-०) फवारणी १ टक्का मात्रेत करावी. फवारणी केल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांत पालवी किंवा मोहोर ज्या प्रमाणात तयार आहेत, त्यानुसार पालवी किंवा मोहोर बाहेर पडेल. ज्या झाडातून पालवी अथवा मोहोर बाहेर पडत नाही, अशा झाडावर पुन्हा पंधरा दिवसांनी फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post