आंबा
पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास आणि फवारणी घेणे आवश्यक असल्यास पावसाची उघडीप पाहून तसेच फवारणी द्रावणात स्टीकर मिसळून फवारणी करावी.
👉आब्याचा मोहोर रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी अॅझॉक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून पालवी तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या झाडावर फवारणी करावी.
👉पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कोवळ्या पालवीचे किडीच्या प्रादुर्भावाकरिता निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
👉बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनाझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉मोहोर फुटलेल्या बागेमध्ये तुडतुडे, मिजमाशी इत्यादी किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने मोहोर फुलण्यापूर्वी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ ईसी) ०.३ मि.लि. किंवा ब्युप्रोफेझीन (२५ एससी) २ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(*मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी १०-१२) वगळून फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.