केळी
बागेचे व्यवस्थापन
👉 केळी लागवडीच्या वेळेस सजीव कुंपण लावले नसल्यास बागेभोवती ज्वारी किंवा बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावेत किंवा हिरवी शेडनेट बागेभोवती लावावी.
👉 मुख्य खोडालगत येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत दर २-३ आठवड्यांनी कापावीत.
👉 बागेची सर्वसाधारण स्वच्छता राखावी. बागा निंदणी, कुळवणी करून स्वच्छ ठेवाव्यात.
👉 मृगबागेत टिचणी करून जमिनीवरील तडे बुजवावेत. झाडांना माती लावून आधार द्यावा.
👉 नियमितपणे ठिबक संचाची पाहणी करावी. गरज भासल्यास दुरुस्ती करावी.
👉 बागेतील सर्व विषाणूग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
👉 केळफुल निसवताच २-६ टक्के सच्छिद्रता असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा पॉलीप्रोपॅलीनच्या पिशव्या वापरून घड पूर्णपणे झाकावे किंवा जुन्या कांदेबागेमधील फळवाढीच्या अवस्थेतील घड हे कोरड्या केळी पानांनी झाकावेत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.