गहू
बागायती उशिरा पेरणीसाठी खत व्यवस्थापन
शेवटच्या कुळवणी आधी एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे. शिफारशीप्रमाणे बागायती उशिरा पेरणीसाठी गहू पिकास नत्र ३२ किलो, स्फुरद १६ किलो व पालाश १६ किलो प्रति एकरी द्यावे. यापैकी पेरणीवेळी निम्मे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश; म्हणजेच ३५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २७ किलो किलो म्युरेट ऑफ पोटॅश दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. उरलेले निम्मे १६ किलो नत्र; म्हणजेच ३५ किलो युरिया पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.