रब्बी ज्वारी अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

 रब्बी ज्वारी

अमेरिकन लष्करी अळी

अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि तो कमी प्रमाणात असल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडीरॅक्टीन (१,५०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अमेरिकन लष्करी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी, मेटारायझिअम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम किंवा नोमुरिया रिलाय ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास, नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.% झेडसी) ५० मि.लि. प्रति एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतामध्ये एकरी ५ कामगंध सापळे; तर नर पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करून मारण्यासाठी १५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा. वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post